मुक्तविहार विषयी
आवश्यक, उपयोगी, मनोरंजक, मार्गदर्शक इत्यादि जे जे काही असेल ते ते 'मुक्तविहार' च्या अंतर्गत शेयर करण्याचा प्रयत्न आहे. ज्यामध्ये इंटरनेटवर आणि/किंवा दैनंदिन प्रत्यक्ष जीवनात आवडलेला, निवडक, दिशादर्शक असा मजकूर, चित्रे, व्हिडिओ किंवा या सर्वांच्या लिंक्स असतील. अशा प्रकारचा मजकूर हा 'साप्ताहिक' स्वरूपाचा असेल. म्हणजे साप्ताहिक स्वरूपात वर्गीकृत असेल. तसेच तो विविध लेबल च्या अंतर्गत ही वर्गीकृत असेल.
सदरील वेबसाइट वरील संबंधित ब्लॉग पोस्ट मधील अथवा पेज वरील भाषा ही कधी कधी मुक्त, दिलखुलास अशा प्रकार ची ही वापरण्यात आलेली आहे. ती भाषा त्या त्या वर्गातील लोकांसाठी च्या वाचनासाठी आणि त्यांच्या मनाच्या विरंगूळयसाठी मुद्दाम वापरलेली आहे. कृपया, जाणकार लोकांनी समजून घ्यावे.
मुक्तविहार म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसून 'मुक्तपणे विहार करून' बऱ्याचशा गोष्टी पाहणे!
सध्यातरी हे शीर्षक या वेबसाइट च्या स्वरूपात सुरू केलेले आहे आणि या वेबसाइटवर (या शीर्षकाच्या माध्यमातून) ऑनलाइन (म्हणजेच मोबाईलवर/पीसीवर इंटरनेट सर्फिंग करीत असताना) तसेच ऑफलाइन (म्हणजेच प्रत्यक्ष जीवनात फिरत असताना) जे जे काही आवश्यक (म्हणजेच उपयोगी, मनोरंजक इ.) वाटले ते ते शेयर करणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये तुम्ही लेखन, फोटोज, व्हिडिओज सोबतच विविध मजकूर आणि लिंक्स देखील पाहू शकता.
हे शीर्षक आम्ही कुठेही रजिस्टर केलेले नाहीये. तसेच हा शब्द या अगोदर नेहमीच वेगवेगळ्या पुस्तकांतून, मासिकांतून, वृत्त पत्रांमधून सुद्धा वापरलेला आहे याची आम्हाला कल्पना आहे तसेच https://muktvihar.blogspot.com/ या नावाने एक ब्लॉग सुद्धा आहे यांची आम्हाला पूर्ण कल्पना आहे; त्यामुळे काहीतरी नवीनच शब्द आम्ही वापरत आहोत असे आम्हाला मुळीच म्हणायचे नाही; पण
'मुक्तपणे फिरून काहीतरी वेगळे जगणे, वैविध्य पाहणे आणि ते शेयर करणे'
या गोष्टीला केवळ हाच शब्द साजेसा वाटला म्हणून ताबडतोब हाच शब्द या संकल्पनेला 'शीर्षक' म्हणून वापरला!
या वेबसाइट वरील विविध साप्ताहिक आणि मासिक अशा पद्धतीनेही वर्गीकृत केलेला मजकूर, ब्लॉग पोस्टस, लिंक्स इत्यादि आपल्याला नक्की आवडेल असे वाटते!
तरीसुद्धा उद्यम रजिस्ट्रेशन UDYAM-MH-25-0039134 च्या अंतर्गत एक Unit म्हणून आम्ही या शीर्षकाचे रेजिस्ट्रेशन केलेले आहे. कुठल्याही प्रकारचा आक्षेप असेल तर नक्की Comment च्या माध्यमातून किंवा keynextsolutions@gmail.com वर ईमेल करून कळवावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा