सध्याच्या काळात मोबाइल मुळे कनेक्टिव्हीटी खूप वाढलेली आहे; त्याच प्रमाणे, मोबाइल वरचा वावर (access, धुंडाळणी) खूप वाढलेली आहे! याच स्थितीमध्ये इंटरनेट वर किंवा प्रत्यक्ष जीवनात वावरत असताना विविध आवश्यक, उपयोगी, मनोरंजक इत्यादि शेयर करण्याजोग्या गोष्टी कुठेतरी एकत्रित शेयर करण्याची संकल्पना डोक्यात खूप दिवसांनी होती! पण काही दिवसांपूर्वी अचानक 'विहार' म्हणजे वावरणे/फिरणे या अर्थाने हा शब्द डोक्यात आला आणि त्याच त्या बंदिस्त जीवनाच्या बाहेर एक 'मुक्तविहार' ही करता येतो ही कल्पना डोक्यात आली आणि लगेच 'मुक्तविहार' च्या माध्यमातून विविध गोष्टी शेयर करायच्या ठरले.
त्यानुसार 'मुक्तविहार' या वेबसाइट वर विविध उपयोगी मजकूर अथवा त्याच्या लिंक्स शेयर करणे प्रस्तावित आहे.
'मुक्तविहार' अंतर्गत येणारी भाषा कधी ओघवती तर कधी रेखीव ठेवण्याचा प्रयत्न असेल.
[टीप: ब्लॉग पोस्ट अजूनही अपूर्ण आहे आणि जसजसा वेळ मिळेल आणि जसजसे सुचेल तसतसे एडिट करून त्यामध्ये अॅड करणे चालू आहे.]
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा